Friday, May 3, 2024
Homeनगरअस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यात अर्थच नाही

अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यात अर्थच नाही

सुपा |वार्ताहर| Supa

आपल्या दृष्टीने तालुक्यातील विकास कामे महत्त्वाची असून अस्तित्व संपलेल्या लोकांविषयी बोलण्यात अर्थच नाही, अशी टीका आमदार निलेश लंके यांनी केली

- Advertisement -

कोहोकडी येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सुदाम पवार होते. यावेळी आ. निलेश लंके म्हणाले जगात, देशात करोना महामारीचा हाहाकार चालू आहे, गावागावांमध्ये अनेक विकास कामांची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

तालुक्यातील साकळाई योजना, के. के. रेंज, राळेगण सिद्धी पाणी योजना अशा अनेक योजनांच्या अनेकवेळा घोषणा होऊन सुद्धा त्या हवेत विरल्या, मात्र मी विधानसभा सदस्य झाल्याबरोबरच अनेक योजनांचा पाठपुरावा करून त्या कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न चालू केले.

तालुक्यातील ज्या भागामध्ये विकासकामांची गंगा पोहचलीच नाही अशा अनेक कामांबरोबरच उर्वरीतही कामांचा अभ्यास पूर्ण असा मास्टर प्लॅन करून अनेक कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला.

करोना महामारीने मात्र निधी मिळण्यास थोडा विलंब लागला, मात्र थोड्याच दिवसांत तालुक्यातील सर्वच विकास कामे लवकरच चालू झालेली दिसतील असेही आ. लंके म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रा. संजय लाकुडझोडे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, सरपंच ठकाराम लंके, चंद्रकांत लंके, सरपंच राहुल झावरे, अरुण पवार, सरपंच डॉ. साहेबराव पानगे, उपसरपंच किसनराव रासकर, बाजार समितीचे संचालक अण्णा बढे, भाऊसाहेब मदगे, सोमनाथ वरखडे, सचिन वराळ, विक्रम कळमकर, अरुण कळमकर, बाळासाहेब खोसे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या