Friday, May 3, 2024
Homeराजकीयवाढत्या करोना संसर्गात जिल्ह्यातील तीनही मंत्री गायब

वाढत्या करोना संसर्गात जिल्ह्यातील तीनही मंत्री गायब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे. नगरचे सुपुत्र असलेले तीन मंत्री शहरात निर्माण झालेल्या गंभीर

- Advertisement -

परिस्थितीबद्दल भाष्य करताना किंवा उपाययोजना करताना दिसत नाहीत. ते कुठे आहेत हेही जनतेला माहिती नाही. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही नागरिकांना मदत करताना दिसत नाहीत.

त्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि सरकारनेही करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जबाबदारी स्वीकारावी, असा टोला माजी मंत्री, आ. राधाकृष्ण विखे यांनी लगावला.

महापालिका, भाजप व पंडित दीनदयाळ पतसंस्थेने संयुक्त सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन आ. विखे यांच्याहस्ते झाले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार आणि नगरच्या लोकांनी टाळेबंदीची मागणी केली म्हणून पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले.

परंतु आता बारामती आणि पालकमंत्र्यांच्या कागल तालुक्यातच टाळेबंदी लावण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. करोना संसर्गाचे गांभीर्य राज्य सरकारला दिसत नाही, ज्यांनी उपाययोजना करायच्या आहेत ते घरात बसले आहेत, अपयश झाकण्यासाठी कंगना राणावतच्या वक्तव्याचा आड लपत आहेत, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, राज्य सरकारचे अस्तित्वच कुठे दिसत नाही, अशी टीका आ. विखे यांनी केली.

त्यांनी ‘कंगना’ ऐवजी करोनाचा विचार करावा

जे भाजपच्या पोटात तेच कंगना ओठात दिसते आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली होती. याकडे लक्ष वेधले असता करोनाचे अपयश झाकण्यासाठी सरकार कंगनाच्या वक्तव्याचा आधार घेत आहे, त्यांनी कंगनाचा विचार सोडून करोनाचा विचार करावा, जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे, त्याची काळजी त्यांनी करावी असा टोला आ. विखे यांनी लगावला.

‘तीन तिगाडा आणि काम बिघाडा’

पालकमंत्र्यांना नगर जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यांचा सगळा वेळ ग्रामपंचायतीमध्ये मागच्या दाराने आपले बगलबच्चे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यातच जातो आहे, परंतु त्यांचा हा डाव न्यायालयाने हाणून पाडला. हे सरकार म्हणजे ‘तीन तिगाडा आणि काम बिघाडा’ आहे अशी टीका आ. विखे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या