Thursday, May 2, 2024
Homeनगरउसासह सर्व बाधित पिकांचे पंचनामे करा

उसासह सर्व बाधित पिकांचे पंचनामे करा

अस्तगाव |वार्ताहर| Astagav

अस्तगाव परिसरात मंगळवारी धुव्वाधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी काल माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

- Advertisement -

उसासह बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी महसूल तसेच कृषी विभागाला दिले आहेत.

राहाता तालुक्यातील सर्वाधिक बाधित परिसराचा त्यांनी काल दौरा केला. त्यांच्या समवेत राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषी अधिकारी शिंदे, बांधकाम विभागाचे अभियंता कर्पे, मंडळाधिकारी जगन्नाथ भालेकर, तलाठी पद्मा भालेकर, ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर,

बाजार समितीचे सभापती वाल्मिकराव गोर्डे, गणेशचे संचालक विजय गोर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, विलास जेजूरकर, अशोक नळे, ज्ञानदेव चोळके, आर. बी. चोळके, अस्तगावकरचे अशोकराव बोर्‍हाडे, राजेंद्र पठारे, राजेंद्र तांबे, बाबुराव लोंढे, माजी सभापती निवास त्रिभुवन, पंकज गोर्डे, गोरख जेजूरकर, डॉ. अरुण जेजूरकर, ज्ञानेश्वर जेजूरकर, प्रा. आप्पासाहेब नळे, सिताराम सापते, सूर्यभान गोर्डे, विपूल गवांदे, प्रदीप चोळके यांचेसह ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

विखे पाटील यांनी अस्तगाव येथील नगर-मनमाड हायवेच्या पश्चिमेच्या जेजूरकर वस्ती भागातील फुटलेल्या गणेश बंधार्‍याची पाहणी केली. हा बंधारा सिमेंट काँक्रिट करून देऊ असे तेथील रहिवाश्यांना त्यानी आश्वासित केले. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आपण संबंधित विभागांना दिले असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले. काही रहिवाशांना पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या नळ्या देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गावठाणातील प्राथमिक शाळेच्या आवारात घुसलेल्या पाण्याची त्यांनी पाहणी करून पाणी काढून देण्याबाबत सूचना केल्या.

प्राथमिक शाळेलगत पुराचे पाणी घरात शिरलेल्या आदिवासी बांधवांच्या घराची पाहणी करून त्यांनी तीन चार दिवस जेवणाची सोय करण्यात येईल. तसेच सातमोर्‍यांवर पादचारी तसेच दुचाकी जाईल इतपत पूल उभारणी करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.

माणसांनी केलेल्या अतिक्रमणामुळे त्याचा माणसांना त्रास होतो, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवू नका, परंतु गावागावांत अतिक्रमण करण्याच्या स्पर्धेमुळे हे घडते. 1996 मध्ये अस्तगावला असाच ओढ्याच्या पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर काल परवा बसला. यावेळी ग्रामस्थांनी ऊस, सोयाबीन, मका, डाळिंब पाण्यात असल्याने ते वाया जाणार आहेत.

त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मांडली. त्यावर आ. विखे पाटील यांनी आपण महसूल, कृषी विभाग यांना उसासह सर्वच बाधित पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी कमी झाल्यावर, रस्ते व्यवस्थित झाल्यावर पंचनामे सुरू होतील. गावातील चर चांगले करा, पाणी वसाहतीत घुसणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.

विजय अंभोरे, रामनाथ चोळके, गणेशचे संचालक जे. आर. चोळके, अविनाश जेजूरकर, अनिल पठारे, सुनिल त्रिभान, शरद त्रिभुवन, सुरेश त्रिभुवन, काशिनाथ जेजूरकर, भास्कर जेजूरकर, राजेंद्र जेजूरकर, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, अनिल नळे, सदुभाऊ गोल्हार, नामदेव उर्फ कुंडलिकराव तरकसे, नामदेव चोळके, भीमराज त्रिभान, यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंपळसला पाहणी दौरा !

अस्तगाव दौर्‍यानंतर आमदार विखे पाटील यांनी यंत्रणेसह पिंपळस भागाचा दौरा केला. तेथील पिकांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने दत्तात्रय घोगळ यांनी व पिंपळस सोसायटीच्यावतीने बंडोपंत खापटे यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी माजी सरपंच भारत ज्ञानेश्वर लोखंडे, तान्हाजी चुळभरे, अण्णासाहेब निरगुडे, सागर कापसे, नितीन वाघमारे, अरुण निरगुडे, ग्रामसेवक श्रीमती तोडमल, भगवानराव डांगे, राजेंद्र कुदळे, बाळासाहेब जगदाळे, रामदास पुंड, रामभाऊ वाघमारे, संदीप लोखंडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या