Thursday, May 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSandeep Deshpande: "गळचेपी करायचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र २.०…"; हिंदी सक्तिविरोधात...

Sandeep Deshpande: “गळचेपी करायचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र २.०…”; हिंदी सक्तिविरोधात संदीप देशपांडेंचा इशारा

मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हिंदी सक्तीविरोधात एकत्र येणार असल्याची घोषणा केली. यावेळी ५ जुलैला हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असून हा राजकीय मोर्चा नसून याचे नेतृत्व मराठी माणूसच करणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी सकाळी एक्सवर राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र असलेला फोटो ट्विट केला. त्याला मराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र असे कॅप्शन दिले. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज साहेबांनी हिंदी सक्तीविरोधात पुढाकार घेऊन संजय राऊत यांना फोन केला. संजय राऊत यांच्याशी फोनवर चर्चा केली. चर्चा करून ५ आणि ६ तारीख ठरली, मात्र ७ तारखेला मोर्चा काढला तर पालक शिक्षक यांना सहभागी होणे शक्य नाही. सर्व साहित्यिक सर्व एकत्र आले तर देशाला ताकद दाखवू अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंचा कायम ऋणी राहील
पुढे ते म्हणाले की, “मराठी माणसासाठी जो पुढाकार राज ठाकरेंनी घेतला आहे. यासाठी मी त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा कायम ऋणी राहील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येतील की नाही त्याचा दोन भाऊ निर्णय येतील.” असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले आहे.

मराठी माणसासाठी जेलमध्ये जायची तयारी
आम्ही सर्व राजकीय पक्षाशी संवाद साधणार शिंदे सेना भाजप सर्व जे जे मराठीवर प्रेम करतात ते सर्व सहभागी होतील. राज साहेबांचा व्हिडीओ होता मराठीसाठी कोणाचेही पाय चाटू आणि छाटू. आम्ही केसेसला कधीही घाबरत नाही मराठी माणसांसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे. या निमित्ताने आम्ही सर्व मराठी माणसांशी संपर्क करणार आहोत. या मोर्चात कोण कोण सहभागी होते ते बघणार आहोत. गुणरत्न सदावर्तेंवर बोलणे संदीप देशपांडे यांनी टाळले आहे. त्यांनी थेट पुढचा प्रश्न विचारा असे म्हणून विषय टाळला.

तर संयुक्त महाराष्ट्र २.० ची आठवण करुन देईल
“गळचेपी करायचा प्रयत्न केला तर मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र 2.0 ची आठवण करून देईल. हा मोर्चा ना राज ठाकरेंचा आहे ना उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा फक्त मराठी माणसासाठी असणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा नसेल,” मराठी भाषेसाठी या मोर्चात पत्रकार संपादकाने देखील सहभागी व्हावे असे म्हणत संजय राऊतांना संदीप देशपांडे यांनी चिमटा काढला.

हिंमत असेल तर गुजरातील अभिजात भाषेचा दर्जा द्या
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, मराठीला भाषा अभिजीत भाषेत दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असेल, तर मग गुजराती भाषेला तोच दर्जा देऊन दाखवा. मुळात मराठी भाषेला दर्जा मिळाल तो तिच्या वैभवामुळे मिळाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य, ती भाषा समृद्ध असावी असावी लागते. त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावे लागते. त्याशिवाय दर्जा मिळत नाही. तुम्ही शक्तीशाली आहात, तर मग गुजरातीला दर्जा करून दाखवा. मोदी असतील किंवा ट्रम्प असतील, गुजरातीला अभिजात दर्जा करून दाखवा.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrirampur : निर्मळपिंपरी बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपुरातील डॉ. कुटेसह दोन...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत...