Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMNS vs Ajit Pawar : "भाजपचा पदर पकडून अन् मोदींचं नाव घेऊन...";...

MNS vs Ajit Pawar : “भाजपचा पदर पकडून अन् मोदींचं नाव घेऊन…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला मनसे नेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या मुंबईत (Mumbai) झालेल्या मेळाव्यात बोलतांना विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) निकालावर शंका उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांना ४२ जागा आणि शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या असा सवालही त्यांनी विचारला होता. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा उल्लेख केला करत टीका केली होती.

- Advertisement -

तसेच राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर केलेल्या वक्तव्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही असे म्हणत अजित पवारांनी “तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता. या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता, राज ठाकरेंवर पलटवार केला होता. त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी माध्यमांशी बोलतांना अजित पवारांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “अजित पवार यांचा मुलगा आणि पत्नी देखील निवडणुकीत निवडून आले नव्हते. आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि आम्हाला जी काही मतं मिळाली आहेत, ती राज ठाकरे यांच्या जीवावर आणि आमच्या पक्षाच्या जीवावर मिळालेली आहेत. पण, भाजपचा (BJP) पदर पकडला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव घेतले म्हणून आम्हाला मतं मिळालेली नाहीत. अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत, ती भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून मिळाली. त्यांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, असे म्हणत त्यांनी संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.

अजित पवारांच्या टीकेवर मनसे नेते अमित ठाकरे काय म्हणाले होते?

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेवर बोलताना “अजित पवारांना उत्तर द्यायला मी फार लहान आहे, राज ठाकरेचं त्यांना उत्तर देतील. मात्र, पराभावामुळे मी खचलो नाही पण, शिकायला खूप मिळाले. माझी ही पहिलीच निवडणूक होती, माझ्या पहिल्या नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करावे अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...