Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा; म्हणाले, "तुम्ही...

Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर पुन्हा निशाणा; म्हणाले, “तुम्ही जूने असून काय उ…”

मुंबई | Mumbai
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त कधी अशा ही चर्चा रंगू लागल्या. राज ठाकरेंनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला होता. राज्यात अनेक ठिकणी मनसे आणि शिवसैनिक एकत्र आल्याचे पहायला मिळाले. मुंबईमध्येही ही परिस्थिती पाहायला मिळाली होती. मुंबईमध्ये नव्या युतीची नांदी होत असतानाच फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली अन् राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली.

गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करताना थेट ‘चमचा’ म्हणून संबोधले होते. त्याला संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सोमवारी संदीप देशपांडे यांनी आणखी पुढे जात ठाकरे गटाला डिवचले आहे. संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उद्देशून ट्वीट केले आहे ज्याची चर्चा होत आहे. ठाकरेंना लक्ष करताना देशपांडे यांनी अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केलेय.

- Advertisement -

काय म्हणाले संदीप देशपांडे?
होय आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.’जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’, असे म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी २० हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली, असे संदीप देशपांडेंच्या या पोस्टमध्ये म्हटले. त्यामुळे आता या टीकेला संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...