Sunday, October 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ’

ठाणे

लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व ठाणे येथील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेचे आज ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत बोलतांना आपल्या भाषा शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.दरम्यान, सभेपूर्वी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. आनंद दिघे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते.

- Advertisement -

भाषणाच्या सुरवातीस राज ठाकरे म्हणाले की, लोकसंख्येवरुन बाकीच्या जिल्ह्यात एखादी महानगर पालिका असते. परंतु ठाण्यात सात ते आठ महानगर पालिका आहेत. बाहेरचे लोंढे थांबवले नाहीतर तर कितीही रस्ते केले, पूल बांधले तरी काहीही फरक पडणार नाही. मेट्रो आणली तरी कमीच पडणार आहे. मूळ माणसाच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी दिल्लीत गेल्यानंतर हे लोंढे थांबवा, असं सांगितलं पाहिजे.

राज ठाकरे म्हणाले की, यंदाची ही पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीला विषयच नाही, सगळेजण एकमेकांचा उद्धार करताना दिसून येत आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचे मुद्दे निवडणुकीत आले पाहिजेत, परंतु तसं होत नाही. ‘माझे वडील चोरले’ अशा मुद्द्यावर निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी. शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्यासोबत आमदार फोडले.

या वेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ ‘ म्हणत आणि सुषमा अंधारेंचा व्हिडीओ सुरु झाला. व्हिडीओमध्ये अंधारे म्हणत होत्या की, ८०-८५ वर्षांच्या म्हताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग, हात थरथरथर कापायला लागलेत, काय उपयोग. ही जुनी क्लिप राज ठाकरेंनी पुन्हा दाखवली.राज ठाकरे पुढे म्हणाले की, याच बाईंना उद्धव ठाकरेंनी पक्षाचं उपनेतेपद दिलंय. भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसता,आणि बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे असं म्हणता? असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या