नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्र सरकारने सामाजिक कल्याण आणि निवृत्तीवेतनाच्या ५ महत्त्वाच्या योजनांच्या तसेच उपयोजनांच्या नावांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बदलांनुसार, आता या योजनांची जुनी नावे बदलून त्यांना मंजूर झालेली नवीन नावे देण्यात आली आहेत. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमासह (NSAP) एकूण पाच योजना आणि उपयोजनांची नावे बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाने सुरू असलेल्या वृद्धापकाळ पेन्शन, विधवा पेन्शन आणि दिव्यांग पेन्शन योजनांचाही समावेश आहे.
या निर्णयातील महिलांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचे नाव आता ‘प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना’ असे करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचे नामकरण ‘प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना’ असे होईल. सरकारने या कार्यक्रमाला २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्यासही मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकूण ५३,४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोणकोणत्या योजनांची नावे बदलली?
या कार्यक्रमांतर्गत योजनांची आणि उपयोजनांची नावे बदलणे, दिव्यांग व्यक्तींच्या निवृत्तिवेतनासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची व्याप्ती आणि अर्थसहाय्याच्या रकमेत बदल करणे, तसेच वृद्ध आणि विधवा व्यक्तींसाठीच्या निवृत्तिवेतन योजना आणि कुटुंब लाभ योजना सध्याच्या स्वरूपात सुरू ठेवणे, या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
इम्रान खानला CJP आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात; मुंबईसह देश सोडण्याची दिली नोटीस
केंद्र सरकारने सामाजिक कल्याण आणि निवृत्तीवेतनाच्या (पेंशन) ५ महत्त्वाच्या योजनांच्या तसेच उपयोजनांच्या नावांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बदलांनुसार, आता या योजनांची जुनी नावे बदलून त्यांना मंजूर झालेली नवीन नावे देण्यात आली आहेत.
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) या योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना’असे करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS) आता ‘प्रधानमंत्री वृद्धावस्था पेंशन योजना’ या नावाने ओळखली जाईल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना (IGNWPS) या योजनेचे नवीन नाव ‘प्रधानमंत्री विधवा पेंशन योजना’ असे ठेवण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन (IGNDPS)योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री दिव्यांगजन पेंशन योजना’ करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना आता‘प्रधानमंत्री परिवार लाभ योजना’ या नावाने ओळखली जाणार आहे.




