Thursday, March 13, 2025
Homeक्राईमदीड लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने लांबवली

दीड लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने लांबवली

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील देवाचा मळा येथील श्रीकांत सुरेश लांडगे यांनी दुचाकीला अडकवलेली पैशांची बॅग अज्ञात चोरट्याने चोरुन (Money Bag Theft) नेली आहे. या बॅगमध्ये 1 लाख 40 हजार रुपयांसह इतर साहित्य होते. सदर घटना शनिवारी (दि.14) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की श्रीकांत लांडगे यांचे मेडिकल आहे. शनिवारी रात्री मेडिकलचे सर्व काम आटोपून त्यांनी पैसे बॅगमध्ये (Bag) भरले आणि दुचाकीवरून घरी जात असताना अकोले बाह्यवळण जवळ आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांची दुचाकीच्या हँडलला अडकवलेली पैशांची बॅग बळजबरीने ओढून धूमस्टाईलने पोबारा केला.

या बॅगेत 1 लाख 40 हजार रुपयांची रक्कम, दोन एटीएम, भरणा पुस्तक, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स होते. दरम्यान, लांडगे यांनी जोरजोराने आरडाओरड केला. मात्र चोरटा काही क्षणात दिसेनासा झाला होता. त्यानंतर लांडगे यांनी दुचाकीस्वाराचा शोध घेतला पण काहीच उपयोग झाला नाही. याप्रकरणी श्रीकांत लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...