Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमान्सून केरळच्या उंबरठ्यावर रेंगाळला

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर रेंगाळला

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

- Advertisement -

पुणे | प्रतिनिधी Pune

यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर वेळेच्या सहा दिवस आधीच, म्हणजेच १६ मे रोजी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवास आता काहीसा मंदावला आहे. अंदमानात लवकरहजेरी लावल्यामुळे मान्सून केरळमध्येही लवकर येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता; मात्र प्रत्यक्षात
मान्सून अद्याप केरळच्या उंबरठ्यावरच रेंगाळला आहे. हवामान विभागाने मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, सद्यस्थितीत वारे काहीसे क्षीण असल्याने केरळमधीलआगमनासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाच्या निकषांनुसार, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यासाठी काही विशिष्ट अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. यामध्ये केरळ आणि लक्षद्वीपमधील १४ महत्त्वाच्या हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस ठराविक प्रमाणात पाऊस पडणे, वाऱ्याचा वेग आणि ढगांची स्थिती या बाबींचा समावेश असतो. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वारे वाहत आहेत, परंतु मान्सूनला गती देण्यासाठी आवश्यक असणारे कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळाची स्थिती सध्या निर्माण झालेली नाही. काही हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी अजून किमान चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. मान्सूनच्या या रेंगाळलेल्या प्रवासाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही दिसून येत आहे.

राज्याच्या दक्षिण भागात आणि कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भाला उष्णतेच्या लाटेने ग्रासले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता असून, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली यांसारख्या शहरांमध्ये रात्रीचे तापमानही ३० ते ३२ अंशांच्या दरम्यान राहून नागरिकांना उष्णतेच;चा त्रास सहन करावा लागणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांनुसार, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर अमरावती आणि अकोल्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात २८ मे रोजी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, तिथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...