Sunday, May 3, 2026
Homeदेश विदेशMontha Cyclone: आंध्रच्या किनारपट्टीवर 'मोंथा' धडकणार, तीव्र चक्रीवादळात झाले रुपांतर; महाराष्ट्रातील 'या'...

Montha Cyclone: आंध्रच्या किनारपट्टीवर ‘मोंथा’ धडकणार, तीव्र चक्रीवादळात झाले रुपांतर; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा फटका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून या चक्रिवादळाला‘मोंथा’ हे नाव देण्यात आले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असणारे हे चक्रीवादळ मोंथा गेल्या सहा तासांत ताशी १५ किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तरपश्चिमेकडे सरकले आहे आणि मंगळवारी पहाटे ५.३० वाजता या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

‘मोंथा’ चक्रिवादळ आज संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पोहचणार आहे. यामुळे आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना देखील अती दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम हा फक्त आंध्र प्रदेश पुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचा परिणाम हा महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागातही जाणवणार आहे.

- Advertisement -

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी ‘मोंथा’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाऊस आणि पुराची शक्यता आहे अशा भागात अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि चक्रि‍वादळाबद्दल माहिती घेतली.

हवामान विभागाचा आंध्र प्रदेशला इशारा
भारतीय हवामान खात्याचे उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोंथा चक्रीवादळ मंगळवारी सायंकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकण्याचा अंदाज आहे. याचा प्रभाव हा मछलीपट्टणम आणि कलिंगापट्टणम जवळ जास्त असणार आहेत. यामुळे आंध्र प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतीवृष्टी होण्याचा अंदाज आहे.’ ‘आम्ही आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पेड्डापल्ली, जयशंकर फुपालपल्ली आणि मुलुगू या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर पूर्वोत्तर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने सोमवारी आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील काकीनाडा, कोनसीमा, पश्चिम गोदावरी, कृष्णा, बापटला, प्रकाशम आणि एसपीएसआर नेल्लोर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रालाही पावसाचा अलर्ट
मोंथा चक्रीवादळामुळे पुढील काही तासात पुण्यासह राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांसाठी इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ वायव्येकडे सरकून मंगळवारी (२८ ऑक्टोबर) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांना रेड अलर्ट, तर पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा आधीच तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथ्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतोय. त्यातच मोंथा चक्रीवादळाचा देखील परिणाम महाराष्ट्रातील विदर्भावर होणार आहे. त्यामुळे पाऊस अजून काही दिवस राज्यात मुक्काम करणार आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर नंतर या चक्रीवादळाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...