Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशDelhi Bomb Threat: राजधानी दिल्लीत ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची...

Delhi Bomb Threat: राजधानी दिल्लीत ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील अनेक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देऊ अशा धमक्या मिळाल्या आहेत. शाळांच्या इमारतीत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा स्फोट केला जाईल, असा ईमेल या शाळांना पाठवण्यात आला आहे. यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये एक आरके पुरममधील आणि दुसरी पश्चिम विहारमधील, मदर मेरी स्कूल, ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूल यासह अनेक शाळा समाविष्ट आहे. या मिळालेल्या धमकीनंतर शाळा प्रशासनाने मुलांच्या जिवाची काळजी घेत सर्वांना घरी पाठवले आहे. या घटनेची माहिती ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने ट्वीट करत दिली आहे. शाळांच्या इमारतीत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा स्फोट केला जाईल, असा ईमेल या शाळांना पाठवण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्याने ३० हजार डॉलर्सची मागणी केली आहे.

- Advertisement -

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबरोबरच बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी हजर झाले आहे. धमकी मिळताच दिल्ली पोलीस दिल्ली पब्लिक स्कुल आणि आरके पुरमच्या दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पोहोचले आहे. दरम्यान, या आधी ही शाळांना अशा प्रकारच्या धमक्यांचे ई-मेल अनेकदा आले आहे. मात्र त्यानंतर अफवा असल्याचे समोर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह ४० शाळांना बॉम्बची धमकी देणारा ई-मेल आला होता. मेलमध्ये लिहिले आहे – “मी शाळेच्या इमारतींच्या आत अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय चांगले लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, परंतु बॉम्बचा स्फोट झाल्यावर बरेच लोक जखमी होतील. ३०,००० अमेरिकन डॉलर्स मला मिळाले नाही तर मी बॉम्बचा स्फोट करीन.

धमकीच्या ई-मेलनंतर शाळा प्रशासनाने खबरदारी म्हणून, तात्काळ मुलांना घरी पाठवून पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

या आधी ही मिळाल्या धमक्या
दिल्लीच्या शाळांना या आधीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही अनेकवेळा असे प्रकार उघडकीस आले आहेत. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2024 रोजी डीपीएस आरकेपुरमच्या मुख्याध्यापकांना शाळेत बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मे महिन्यातही अनेक शाळांना पुन्हा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...