Friday, May 3, 2024
Homeजळगावआई व मुलाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

आई व मुलाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

पाचोरा (Pachora) प्रतिनिधी

अंतुर्ली खु प्र.लो. ता. पाचोरा येथे कापसाच्या पिकावर फवारणी करीत असताना आई फवारणीसाठी लागणारे पाणी विहिरीतून ओढून मुलाला देत होती. दरम्यान विहारीतून बादलीने पाणी ओढत असतांना पाय घसरल्याने आई विहरीत पडल्याचे निदर्शनास येताच मुलाने धावत जाऊन आईला वाचविण्यासाठी विहरीत उडी मारली.

- Advertisement -

मात्र विहरीत 45 फुट पाणी व मुलास फारसे पोहता येत नसल्याने त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज शेजारच्या शेतातील नागरीकांना आल्याने त्यांनी धावत जाऊन विहिरीजवळ जावून पाहिले तर त्यांना मुलगा व आई विहरीत पडल्याचे दिसून आले. शेत गावालगत असल्याने त्यांनी आरडाओरड केली. गावकरी आल्यानंतर पोहणार्‍यांनी त्या विहिरी बाहेर काढून त्यावेळी आई व मुलाचाही मृत्यू झाला होता.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू असल्याने पोलिस पोलीस चौकशी नंतरच आत्महत्या की, आकस्मात मृत्यू याचा उलगडा होणार आहे. नितीन पंढरीनाथ पाटील (वय – 25) वर्षे आणि त्याची आई प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय – 45) रा. अंतुर्ली खुर्द प्रलो, ता. पाचोरा असे मयतांची नावे आहेत.

प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतुर्ली शेअत शिवारात शेत आहे. दि. 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणीसाठी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी 2 वाजेच्या त्यांच्या शेतातील विहिरीजवळ गेल्या. विहिरीतून पाणी काढत असतांना त्याचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचविण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. दरम्यान विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळता परीसरातील शेतातील शेतकरी व नागरीकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह आणण्यात आले आहे मयतांचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले त्यांचेवर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन वर्षांपूर्वी नितीन पाटील यांचा भावाचे देखील विहिरीत पडून मृत्यू झाला होता अशी माहिती येथील नागरीकांनी बोलतांना दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या