Friday, May 3, 2024
Homeनगरया तालुक्यात चक्क मोटारसायकलवरून वाळूतस्करी

या तालुक्यात चक्क मोटारसायकलवरून वाळूतस्करी

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

वाळूतस्करांनी मुळानदी पात्रातून वाळूतस्करी करण्यासाठी मोटरसायकलचा नवीन फंडा शोधून काढत महसूल विभागाला चकवा देण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत पोलीस प्रशासन व महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. या वाळुतस्कराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात आरडगाव, तांदुळवाडी, मानोरी, केंदळ खुर्द केंदळ बुद्रुक आदी गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुळानदी पात्रातून पाणी असतानाही रात्रीच्यावेळी चोरट्या पध्दतीने वाळू तस्करांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. यापूर्वी डंपर, ट्रॅक्टर, जेसीबी, बैलगाडी, पाणबुडी (बोट) तसेच गाढवाच्या साह्याने वाळूतस्करी करताना आपण पाहीले असेल.

परंतू, आता वाळूतस्करांनी मोटरसायकलच्या साह्याने वाळू तस्करी करणार्‍यांचा शोध काढून महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू केले आहे. मोटारसायकलच्या सिटवर दोन्ही बाजूंनी मजबूत खोळी करून रात्रीच्या वेळी वाळू बाहेर काढून साठा करून बाहेर पाठविली जाते. या वाळूतस्करीचा प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या