Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार

२७ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे २७ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून राज्यात ९० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.

या सामंजस्य करारानुसार एमडीएलने दिघी येथे प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे.

आज झालेल्या सामंजस्य करारावर एमडीएलतर्फे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज

माणसाची दोन टोकाची रूपं असतात, यातलं दुसरं टोक नाना…; राज ठाकरेंची...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्रासह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर...