Friday, May 3, 2024
Homeनगरअखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इतर संघटनांचे आंदोलन

अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इतर संघटनांचे आंदोलन

शेवगाव | तालुका प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार दडपशाही करत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी दि. ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेले होते.

- Advertisement -

शेवगाव येथे ही अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच व शेतकरी यांच्या वतीने शेवगांव येथे क्रांती चौकात चक्का जाम आंदोलन शनिवारी दुपारी १२ ते १ या वेळेत करण्यात आले .

यावेळी काॅ.सजय नांगरे म्हणाले, केंद्र सरकारने चारही शेतकरी आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांचा अन्न पुरवठा खंडित करण्याबरोबर त्यांच्यावर दगडफेक करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हंटले.

संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार काॅ.संजय नांगरे यांनी केला. सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व तीन कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करणे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ रद्द करणे आदि मागण्यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. कॉ. शशिकांत कुलकर्णी ,कॉ. कृष्ण नाथ पवार, कॉ. संजय नांगरे, काॅ.बापुराव राशीनकर प्रा. शिवाजीराव देवढे कॉ. वैभव शिंदे, कॉ. संदिप इथापे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ. कारभारी वीर ,कॉ. शंकर देवढेकॉ. मुरलीधर काळे,कॉ. विश्वास हिवाळे, कॉ. रविराज काळे, कॉ. रत्नाकर मगर, कॉ. सुभाष चव्हाणअजय मगर , शुभम झिरपे, विशाल इंगळे, राहुल पगारे दिपक मगर शिवा मगर मनोज मोहिते कॉ. सय्यद बाबुलाल कॉ. सुरेश मगर

राष्ट्रीय रिब्लिकन पक्षाचे संजय लहासे ,शेखर तिजोरे, विनोद मगर, राजु दुसंग संभाजी ब्रिगेडचे अमोल दाते, निलेश बोरुडे, शरद जोशी, प्रहार जनशक्ती मंचाचे कल्पेश दळे, संजय नाचन, बाळासाहेब गालपाडे, शंकरराव नेमाने शहिद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष जुबेरशेख सह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या