Thursday, January 8, 2026
Homeनाशिकचणकापुर उजव्या कालव्यास रामेश्‍वर ल.पा साठी पाणी सोडा - खा. भास्कर भगरे

चणकापुर उजव्या कालव्यास रामेश्‍वर ल.पा साठी पाणी सोडा – खा. भास्कर भगरे

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

चणकापुर (Chankapur) उजव्या कालव्यास रामेश्‍वर लघु पाटबंधारे साठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी दिंडोरी लोकसभेचे (Dindori Loksabha) खासदार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

YouTube video player

मागील वर्षी मोठा दुष्काळ होता. त्यामुळे देवळा तालुक्याच्या (Deola Taluka) दक्षिण व पूर्व भागात आजही पाण्याचे मोठे संकट आहे. यासाठी चणकापुर उजव्या कालव्यास रामेश्‍वर न. पा. साठी पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. सध्या चणकापुरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे.

हे देखील वाचा : मुसळधार पावसामुळे चांदोरीतील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली

तसेच सध्या पावसाचे (Rain) प्रमाण चांगले असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लवकरच पाणी साठा पूर्ण होईल म्हणून शेतकर्‍यांच्या व जनतेच्या, कल्याणासाठी आपण कायदा व नियमात थोडा बदल करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे. आता पाणी सोडल्यास आपण रामेश्वर ते झाडी ह्या कालव्यास ही पाणी देऊ शकतो कारण रामेश्वर धरणात पाण्याचा साठा योग्य प्रमाणात राहिला तरच पुढे पाणी योग्य दाबाने जाऊ शकते.

हे देखील वाचा : Nashik News : तळीरामांची झिंग उतरणार; आषाढी अमावस्येनिमित्त पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त

त्याचबरोबर दोन्ही कालव्यांची वहन क्षमता विचारात घेता धरण (Dam) भरण्यास बराच कालावधी लागू शकतो. तरी चणकापुर उजव्या कालव्यास रामेश्वर ल. पा साठी पाणी सोडावे, अशी मागणीही खासदार (MP) भास्कर भगरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे (Collector) केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या