Thursday, November 21, 2024
Homeनगरविधानसभेसाठी नगरमधून महाआघाडीचा श्रीगणेशा

विधानसभेसाठी नगरमधून महाआघाडीचा श्रीगणेशा

ठाकरेंसाठी नगरमध्ये मेळावा

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरेंच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना आहे आणि ते महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधून करणार आहेत, असे खा.नीलेश लंकेंनी सांगितले. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खा. लंकेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक शुभारंभासाठी अहमदनगरमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे सांगत खा. लंकेंनी नगरमधून 12 पैकी 12 आमदार निवडून आणण्याचे उद्धव ठाकरेंना वचन देखील दिले असल्याचे सांगितले. शिवसेनेतील कार्यकाळाची आठवण काढत लंके म्हणाले, बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन

डॉ.राजेंद्र विखे पाटील, सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या खोट्या मुद्यांना खोडून काढण्यात आम्ही कमी पडलो. यातून बोध घेवून आम्हाला आता पुढे जायचे आहे. मोदी हटावचा नारा देणारे हटले परंतू देशाच्या पंतप्रधान पदावर तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले, याचा अभिमान देशवासियांना आहे. महाविकास आघाडीने कसा प्रचार केला या खोलात आता आम्हाला जायचे नाही. माझ्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विखे पाटील जास्त जवळून ओळखतात, असे सुचक वक्तव्य करुन या निवडणुकीने आम्हाला बरेच काही शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात निवडणूक कायात कांदा आणि दूधाच्या भावाचे प्रश्न उपस्थित झाले. याचा अंडर करंट होता. दूधाला पाच रुपये अनुदान दिले. काही शेतकर्‍यांना मिळाले, काहींना मिळाले नाही. परंतू आता दूधाच्या भावाबाबत तसेच कांदा आणि सोयाबिन उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार निर्णय करेल. राज्यातील महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी सरकार निर्णय घेतच असून, यापुढेही या निर्णयात सरकार कुठेही कमी पडणार नाही. डॉ.सुजय विखे पाटील यांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, पराभव झाला असला तरी, खचून जायचे नाही.

महाविकास आघाडीच्या खोट्या नॅरेटीव्हमुळे महाविकास आघाडीचा विजय झाला असला तरी, तो फारकाळ टिकणार नाही. पुन्हा एकदा आपण लढू आणि जिंकुन दाखवू. सत्य हे सत्यच असते. विखे पाटील परिवार रात्रंदिवस लोकांसाठी काम करीत आहे. सहकाराच्या माध्यमातून चौथी पिढी आज समाजासाठी कार्यरत आहे. या जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री आणि मी सदैव तत्पर असून, जिल्ह्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही असेही त्यांनी आश्वासित केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या