नाशिक | Nashik
नाशिकच्या ओझर विमानतळावरून (Ozar Airport) जास्तीत जास्त शहरांना जोडणारी विमानसेवा असावी अशी मागणी सातत्याने नागरिक करत होते. त्या अनुषंगाने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी सातत्याने नागरी उड्डाण मंत्रालयात पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. त्यानुसार संपूर्ण देश आता नाशिककरांच्या हवाई टप्प्यात येणार आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय हवाई सेवा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
खासदार राजाभाऊ वाजे यांची निवड होताच शपथविधीच्या विशेष अधिवेशना दरम्यान नाशिक (Nashik) येथून सुरू असलेल्या काही विमानसेवा कमी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. याबाबत खा.वाजे यांनी आक्रमक पवित्रा घेत नागरी उड्डाण मंत्रालयात (Ministry of Civil Aviation) त्याबाबत जाब विचारला. तसेच, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत नाशिक येथील उड्डाण सेवा बंद न करता नाशिक येथून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, कोलकत्ता, लखनऊ, नागपूर, गोवा आधी शहरांसाठी रोजच्या दोन विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.
हे देखील वाचा : Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?
संसदेच्या १८व्या लोकसभेच्या (Loksabha) पहिल्याच अधिवेशनात पुन्हा एकदा खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक येथून सद्यस्थितीत सुरू असलेल्या विमानसेवा कशा पद्धतीने नफ्यात आहेत. तसेच, प्रवाशांचा कसा चांगला प्रतिसाद विमानसेवा कंपन्यांना मिळतो आहे.या आकडेवारीसह नागरी उड्डाण मंत्रालयाला नाशिक ओझर विमानतळावर अधिक विमानसेवा सुरू करणे किती सयुक्तिक ठरेल याबाबत आकडेवारीसह पाठपुरावा केला होता.
हे देखील वाचा : Nashik News : संततधारेने घरांची पडझड; दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू
दरम्यान, खा. वाजे यांच्या पाठपुराव्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने नाशिक ओझर विमानतळावर अधिक विमानसेवा (Airlines) सुरू करणे संयुक्तिक आणि नफ्याचे असेल हे लक्षात घेत देशांतर्गत अधिकच्या विमानसेवांसोबतच काही आंतराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : २८ ऑगस्ट २०२४ – वैचारिक कृतिशीलतेची जोड आवश्यक
कार्गो विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न
नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योजकांचा माल देश विदेशात जलदगतीने पोहचावा यासाठी नाशिक ओझर विमानतळ येथून कार्गो विमानसेवा देखील सुरू करण्यात यावी यासाठी खासदार राजाभाऊ वाजे प्रयत्नशील आहेत. त्याबाबत देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
विमानसेवा होणार होती बंद
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नाशिक येथून सद्यस्थितीत सुरू असलेल्या काही विमानसेवा बंद करण्याचा विचार केला जात होता. मात्र, खासदार राजाभाऊ वाजे यांनी सद्यस्थितीत असलेल्या विमानसेवा बंद न होऊ देता नव्याने सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
नाशिकचे महत्व केले होते खा.वाजे यांनी अधोरेखित
नाशिक ही एकप्रकारे उत्तर महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात शेतीपूरक व्यवसाय, उद्योजकता, पर्यटन, आध्यात्मिक प्रवास याला विशेष महत्व आहे. यासाठी अनेक देश विदेशातील प्रवासी नाशिकमध्ये येत असतात. तसेच नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून देखील अनेक प्रवासी जगभर प्रवास करत असतात. त्याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात नाशिकचे महत्व अधोरेखित केले होते.
नाशिक येथून विमानसेवा
सद्यस्थितीत नाशिक येथील ‘इंडिगो’मार्फत नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, गोवा आणि नागपूर या ठिकाणांसाठी सेवा सुरू आहे. तर नव्याने जम्मू, श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, वाराणसी, जयपूरसह अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच, बाली, बँकॉक, कोलंबो, सिंगापूर या अंतरराष्ट्रीय विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार आहेत.
कनेक्टिंग फ्लाईटमुळे देशासह जग हवाई आवाक्यात
देशातील तसेच आंतरराष्ट्रीय अनेक शहरातील आंतरराष्ट्रीय अनेक विमानतळ नाशिककरांच्या आवाक्यात आल्याने देशासह जगभरातील अनेक शहरात जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लाईटचा चांगला पर्याय प्रवाशांसमोर उभा राहिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा