Thursday, July 23, 2026
HomeनगरShirdi : शिंदे सेना ही अमित शहांची सेना - खा. संजय राऊत

Shirdi : शिंदे सेना ही अमित शहांची सेना – खा. संजय राऊत

वाकचौरेंची मेळाव्याला दांडी; विरोधकांकडे जाऊ नका-खैरेंचा इशारा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेली नाही. मला उत्तम ज्योतिष कळतं, मोदींचा आणि भाजपचा राजयोग आता संपला आहे. पक्ष फोडून, निवडणूक आयोग हाताशी धरून आणि न्यायालय खिशात घालून यांनी सत्ता मिळवली, पण या सर्वांना वनवासात किंवा तुरुंगात जावे लागेल, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी येथे केला. उत्तर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिर्डीत आयोजित भव्य मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

- Advertisement -

राऊत पुढे म्हणाले, शिवसेना एकच आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची! शिंदे सेना ही अमित शहांची सेना आहे. ज्यांना गद्दारीबद्दल पश्चाताप होतोय, त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुखांची माफी मागावी आणि कामाला लागावे. पुढील अडीच-तीन वर्षे पक्ष बांधणीवर लक्ष देऊन शिवसेनेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे. इंधन दरवाढीची खिल्ली उडवताना ते म्हणाले, 80 रुपयांना बिअर आणि 112 रुपयांना पेट्रोल मिळते, मग आता थंड व्हायचं की गरम व्हायचं? घुमना आहे की झुमना आहे? मोदींच्या ममन की बातफवर टीका करताना ते म्हणाले की, पेपरफुटीवर बोलण्याऐवजी ते पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात, तर आरएसएसमध्ये एक लिटर पाण्यात आंघोळीचे प्रशिक्षण दिले जाते.

लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी आरोप केला की, 80 लाख बहिणी अपात्र ठरल्या असून भाऊ बनण्याच्या स्पर्धेत 17 हजार कोटी बेकायदेशीर वाटले गेले. ही निवडणूक रद्द करून तत्कालीन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, विखे पाटलांनी शिवसेनेच्या नादाला लागू नये, असा इशारा राऊत यांनी दिला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत, नीट पेपरफुटीवरून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान याच्यावर टीका केली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अहिल्यानगरमधील रस्ते व शिक्षणाच्या दुरावस्थेवरून सत्ताधार्‍यांना दे माय धरणी ठाय करण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यात सहसचिव प्रवीण महाले यांनी एसआयआर विषयी, तर सोनल संजय शिंदे यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा व पेपरफुटीवर परखड मते मांडली.
मेळाव्याला आमदार सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष सचिन कोते, राजेंद्र दळवी, जगदीश चौधरी, संजय शिंदे, सुहास वहाडणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक
अमर कतारी यांनी केले.

भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी असताना, मी स्वतः त्यांना राजकारणात आणले आणि शिवसेनेची वाट दाखवली. शिवसेनेच्या
ताकदीवरच ते खासदार झाले. मात्र, यापूर्वीही काँग्रेसच्या संपर्कात गेल्यामुळे त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता पुन्हा ठाकरे गटाकडून खासदार झाल्यानंतर त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांकडे आणि आजच्या महत्त्वाच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. ते सध्या विरोधी गटाच्या (शिंदे सेना) संपर्कात असून, ते तिकडे गेल्यात जमाच आहेत, अशी चिन्हे दिसत आहेत. माझी त्यांना जाहीर विनंती आहे की, त्यांनी जाऊ नये; शेवटी त्यांची मर्जी, पण हे बरोबर नाही.

  • चंद्रकांत खैरे (माजी खासदार व शिवसेना नेते)

ताज्या बातम्या

Nashik Rain News : गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी –...

0
नाशिक | Nashik गंगापूर धरण व परिसरात कालपासून पाऊस (Rain) सुरू असल्याने गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्या-...