Friday, May 3, 2024
Homeनगरराज्यसेवा पूर्व परीक्षेकडे तब्बल सव्वासहा हजार विद्यार्थ्यांची पाठ

राज्यसेवा पूर्व परीक्षेकडे तब्बल सव्वासहा हजार विद्यार्थ्यांची पाठ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सेवा पुर्व परीक्षेकडे तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेला जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी हजर होते.

- Advertisement -

राज्य सरकारने अचानक स्थगित केलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि. 21) रोजी पार पडली. नगर शहरातील तब्बल 51 केंद्रावर दोन सत्रात परिक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात 15 हजार 848 परीक्षार्थीं पैकी 9 हजार 505 पाीक्षार्थींनी परिक्षा दिली तर 6 हजार 343 गैरहजर राहिले. दुपारच्या सत्रात 9 हजार 483 विद्यार्थी हजर होते तर 6 हजार 365 विद्यार्थी गैरहजर होते.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा एकूण 51 उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 1 हजार 638 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी परीक्षेसाठी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहिले. सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत परिक्षा पार पडली.

परीक्षेसाठी समन्वय अधिकारी 13, भरारी पथक 2, उपकेंद्र प्रमुख 51, सहायक 51, पर्यवेक्षक 166, सहायक कर्मचारी 97, समन्वय अधिकारी/भरारी पथक सहायक 15, समवेक्षक 661, लिपीक 51, केअर टेकर 51, बेलमन 45, शिपाई 202, पाणीवाटप कर्मचारी 166 आणि वाहनचालक 67 यांनी परिक्षा सुरळितपणे पार पाडली.

परीक्षेसाठी नगरमधील सर्वच केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी होती. करोना नियमांचे कटेकोर पालन करण्यात आले. परीक्षेदरम्यान एकही करोना अथवा लक्षणे असणारे रुग्ण सापडला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या