Friday, May 3, 2024
Homeनाशिकऑक्टोबर हिटमध्ये शेतकऱ्यांना महावितरणचा झटका

ऑक्टोबर हिटमध्ये शेतकऱ्यांना महावितरणचा झटका

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्याच्या (Dindori Taluka) पश्चिम भागातील अनेक गावांचा समावेश महावितरण (MSEDCL) कंपनीच्या करंजवण (Karanjavan) विभागात येतो…

- Advertisement -

या परिसरात महावितरण (Mahavitaran) कंपनीने थकीत वीजबिलासाठी (Pending Electricity Bill) अनेक गावातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा ट्रासफार्मरपासून खंडीत (Power Cut) केला आहे.

सध्या सर्व ठिकाणी द्राक्षबागेच्या छाटणीला सुरूवात झाली आहे. छाटणीनंतर बागांना विविध प्रकारचे विद्रव्य खते देण्यासाठी कृषीपंप चालू करण्याची आवश्यकता असते. महावितरण कंपनीने हिच संधी साधून कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी (Farmers) हतबल झाला आहे.

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषीपंपामागे दहा हजार रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे. करोनामुळे (Corona) गेल्या दोन हंगामापासून बळीराजाला द्राक्षपिकामध्ये मोठ्याप्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

दोन वर्षापासून शेतकऱ्यांना द्राक्षातून भांडवलसुध्दा निघत नसताना महावितरण कंपनीकडून शेतकरी वर्गाची अडवणूक सुरु आहे. पावसाळी हंगामात या परिसरातील कृषीपंप बंद करतात तरी महावितरण कंपनी वर्षानुवर्ष बिल आकारातेच आहे.

कृषीपंपधारकांवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहे. महावितरण कंपनीने कृषीपंपधारकांना विश्वासात न घेता कित्येक वर्षांचे तीन एचपी कृषीपंपाना पाच एचपीचे बिल लावून वसुली केली आहे. त्यात पाच एचपी, साडेसात एचपी कृषीपंपाचा समावेश आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी वर्गाकडे पैसे येण्याचा मार्ग नाही. अनेक शेतकरी ऊसावर तर काही शेतकरी द्राक्ष व टोमॅटो पिकावर पिकावर थोड्याफार प्रमाणात बिल भरण्यास तयार आहे. मात्र सध्या या परिसरात कुठलाही हंगाम चालू नाही.

टोमॅटोचा हंगाम सुरु होण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे तसेच काही शेतकरी सोयाबीन पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली न करता टोमॅटो, सोयाबीन, ऊस, द्राक्ष पिके चालू झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या परिस्थितीनुसार वसुली करावी, शी मागणी विलास जाधव, जयदीप देशमुख, काका कोंड, संजय बर्डे, सुनील कोंड, दिपक बर्डे, गणेश कोंड, संदिप कोंड, जगदिश देशमुख, राजेंद्र देशमुख, बालाजी मोरे, भाऊसाहेब पिंगळ आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या