Friday, May 3, 2024
Homeनगरशनिवारी ‘शट डाउन’; शहराला एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा

शनिवारी ‘शट डाउन’; शहराला एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उद्या, शनिवारी (दि. 26) महावितरण कंपनीकडून महत्वाच्या कामांसाठी मुळा धरण येथील विद्युत वाहिनीवर सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. याच काळात अमृत योजनेवरील दुरूस्तीची कामेही होणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता, केडगाव, कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतरचा पाणी पुरवठा होणार नाही. सदरचा पाणीपुरवठा रविवारी (दि. 27) होणार आहे. रविवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही.सेंटर परिसर, म्युनिसीपल हडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर या भागास सोमवारी (दि. 28) पाणी सोडण्यात येणार आहे.

सोमवारी पाणी पुरवठा नियोजित असलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या भागात मंगळवारी (दि. 29) पाणी पुरवठा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या