Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमShevgaon : एमएसईबी सब स्टेशन येथील चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

Shevgaon : एमएसईबी सब स्टेशन येथील चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

तालुक्यातील गदेवाडी येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये झालेल्या जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक करत तब्बल 5 लाख 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भिमा लक्ष्मण म्हस्के (वय 38), अविनाश कल्याण धुरंधरे (वय 37) व अमोल गणेश रांजवण (वय 36, सर्व रा. बीड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये घुसून वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांना लाकडी दांडके व गजाने मारहाण केली. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील सुमारे 990 लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल व 530 किलो कॉपर कॉईल असा सुमारे 98 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान हा गुन्हा सराईत गुन्हेगार भिमा लक्ष्मण म्हस्के (रा. बीड) व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शेवगाव शहराजवळील वरुर चौक येथे सापळा रचून संशयित वाहन अडवण्यात आले. त्यातील भिमा लक्ष्मण म्हस्के (वय 38), अविनाश कल्याण धुरंधरे (वय 37) व अमोल गणेश रांजवण (वय 36, सर्व रा. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतली असता 10 किलो कॉपर कॉईल, तीन मोबाईल, चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 5 लाख 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, चौकशीत आरोपींनी चापडगाव येथील जिनिंग प्रेसमधील डी.पी. फोडून कॉपर कॉईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आणखी दोन साथीदारांचा सहभाग उघड झाला असून त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य आरोपी भिमा म्हस्केवर राज्यभरात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, आकाश काळे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भगवान धुळे व महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Crime News : शेल अकाऊंट्सचे जाळे; सायबर खेळ करुन ३३...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिककरांना ऑनलाईन गुंतवणुकीच्या (Online Fraud) आणि भीतीपोटी डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर...