Friday, May 3, 2024
Homeनगरमोहरम मिरवणुकीसाठी 64 इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश

मोहरम मिरवणुकीसाठी 64 इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातून (दि. 8 व दि.9) रोजी ममोहरम मिरवणूक काढण्यात येणार आहेत. पोलिसांनी या मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील 64 इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

- Advertisement -

कत्तलची रात्र मिरवणूक 8 ऑगस्ट रोजी कोंड्यामामा चौक (मंगलगेट), दाळमंडई, लालूशेठ मध्यान यांची इमारत, सरस्वती साडी (मंगलगेट), सुरतवाला बिल्डिंग (तेलीखुंट), व्यापारी असोसिएशन बिल्डिंग, कापड बाजार बाबूशेठ बोरा यांची इमारत, शहाजी चौकातील नितू ड्रेसेस, देडगावकर यांची इमारत, नवा मराठा प्रेस इमारत, साफल्य इमारत, बार्शीकर बिल्डिंग (अर्बन बँक चौक), हॉटेल अन्नपूर्णा (आझाद चौक), डॉ. देशपांडे हॉस्पिटल (पटवर्धन चौक), कोर्ट इमारत, यतिमखाना, देवकाते बिल्डिंग (पंचपीर चावडी), हिरा एजन्सी (जुना बाजार), बॉम्बे बेकरी, बुरुडगल्ली, धरती चौक, काका हलवाई बिल्डिंग (रामचंद्र खुट), डॉ. धूत हॉस्पिटल (किंग्ज रस्ता), शकूर शेख यांची इमारत (ब्राम्हण कारंजा), तांगे गल्ली या इमारती तात्पुरत्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस (दि.9) बँक ऑफ महाराष्ट्र (चौपाटी कारंजा), दर्पण बिल्डिंग (दिल्लीगेट), चंद्रलोक अपार्टमेंट दिल्लीगेट, हॉटेल पंजाबी तडका, व्यापारी असोसिएशन बिल्डिंग (आडते बाजार), पिंजार गल्ली, पारशाखुंट, ख्रिस्त गल्ली, बॉम्बे बेकरी, जुना कापड बाजार, पंचपीर चावडी, यतिमखाना, सबजेल चौक, कोर्ट इमारत, सांगळे गल्ली, चौपाटी कारंजा या भागातील प्रमुख इमारती तात्पुरत्या कालावधीकरीता ताब्यात घेण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या