Sunday, September 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMajhi Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात;'या'...

Majhi Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात;’या’ महिलांना मिळाला मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल आहेत. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सन्मान निधी देण्यात आला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानसभेपूर्वी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी, ‘तुतारी’ फुंकणार?

अशातच आता राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या (Woman) खात्यात पैसे जमा झाले आहेत, याबाबतची अधिकृत माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत”,असे तटकरे म्हणाल्या आहेत.

हे देखील वाचा : Sharad Pawar On Rohit Pawar : “त्याची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची…”; शरद पवारांकडून रोहित पवारांबाबत मोठे संकेत

तसेच “ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज (Application) केला होता, मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही, किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याबरोबरच बँक खाते व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनाही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल. बँक खाते आधार क्रमाकांशी लिंक करावे लागेल. त्याशिवाय या योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. राज्य सरकारने महिलांना आवाहन केले आहे की लवकरात लवकर बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे.लाडकी बहीण योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहे”, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाले…

दरम्यान, याशिवाय ज्या महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले आहेत. पण तिसऱ्या हप्त्याचे (Third Installment) पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात ३० सप्टेंबरपर्यंत पैसा जमा होणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर ज्या महिलांनी १ सप्टेंबरपासून अर्ज केले आहेत त्यांना फक्त १५०० रुपये मिळणार आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या