Thursday, May 2, 2024
Homeनगरफुटलेला कालवा दुरुस्तीस होणार विलंब

फुटलेला कालवा दुरुस्तीस होणार विलंब

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील देवगाव येथे मुळा उजव्या कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले व पिकांचेही नुकसान झाले. सर्वत्र पाणी व चिखलामुळे कालवा दुरुस्तीसाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहेत.

- Advertisement -

मुळा उजवा कालवा फुटला

कालवा फुटल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यात काल पुन्हा परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. सर्व पाण्याचा निचरा होवून जोपर्यंत जमीन कोरडी होत नाही तोपर्यंत येथे कालवा बुजवण्यासाठी मुरुम-मातीची वाहने येवू शकणार नाहीत. पाऊस थांबल्यावर वाहने तेथे पोहचण्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर त्वरीत कालवा दुरुस्ती करणार असल्याचे पाटबंधारे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले असून कालव्याची दुरुस्ती आता पावसाच्या उघडीपीवर अवलंबून असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या