Friday, May 3, 2024
Homeनाशिकसौम्य कोविडनंतर दोन महिन्यात उद्भवला 'हा' आजार; आज झाली तिची रुग्णालयातून सुट्टी

सौम्य कोविडनंतर दोन महिन्यात उद्भवला ‘हा’ आजार; आज झाली तिची रुग्णालयातून सुट्टी

नाशिक | प्रतिनिधी (Nashik)

आठ वर्षांची संपदा (नाव बदललेले) दोन महिन्यांपूर्वी सौम्य लक्षणे असलेला करोना संसर्ग (Corona virus) तिला झाला होत. यातून ती पूर्णपणे बरी झाली. मात्र, दोन महिन्यांनी तिला प्रचंड ताप आला, पोटदुखी व दम लागल्यासारखे त्रास जाणवले…

- Advertisement -

यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले. तिच्या आवश्यक त्या चाचण्याही करण्यात आल्या. चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यांनतर तिला कोविडनंतर (Covid 19) लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या एमआयएस-सी (Multi systematic inflammatory syndrome) असल्याचे दिसून आले. तिच्या हृदयास व हृदयाच्या रक्तवाहिन्यांना सूज आल्याचे दिसून आले….

करोनामुक्त झाल्यानंतर तयार झालेल्या अँटीबॉडीजने (antibody) शरीरातील अँटीबॉडीजच्या विरोधात काम करण्यास सुरुवात केल्यामुळे रुग्णांना त्रास जाणवू लागतो.

दरम्यान, तिच्या डॉक्टरांनी तात्काळ स्टेरॉईडस व महागडे इम्यूनोग्लोबुलीन इंजक्शन (Immunoglobulin injection) देऊन औषधोपचार करण्यात आले.

तत्पर निदान व उपचारामुळे या चिमुकलीचे प्राण वाचले. आज तिला रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉ नितीन सुराणा, डॉ. ममता सुराणा व हॉस्पिटल स्टाफ, डॉ अभिजित सांगळे, डॉ ललित लावणकर यांचे नातलगांनी आभार मानले. तसेच हॉस्पिटल स्टाफकडून या चिमुकलीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोविडनंतर काही आठवड्यात लक्षणे आढळून आल्यास त्वरित बालरोगतज्ञांशी संपर्क करावा. लवकरात उपचार घेतले तर कमी खर्चात रुग्ण बरा होऊ शकतो, अन्यथा रुग्णांना वाचविण्यासाठी महागडी इंजक्शन द्यावी लागतात. दुर्दैवाने या आजाराची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येत असल्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे.

डॉ नितीन सुराणा, नाशिक

आजाराची लक्षणे कोणती? (Symptoms of the disease)

ताप येणे

अंगावर पुरळ येणे

पोट दुखणे

जुलाब किंवा अतिसार होणे

बाळ सुस्त होणे

बाळास श्वास घेण्यास त्रास होणे

डोळे लाल होणे

- Advertisment -

ताज्या बातम्या