Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Building Fire : मुंबईमधील बिजनेस पार्क इमारतीला भीषण आग; अनेक मजले...

Mumbai Building Fire : मुंबईमधील बिजनेस पार्क इमारतीला भीषण आग; अनेक मजले भक्ष्यस्थानी

मुंबई | Mumbai

दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले होते. त्यानंतरही मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये जेएनएस बिझनेस सेंटर या इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. काही लोक अडकल्याची माहिती आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. या इमारतीचे 4 मजले आगीच्या विळख्यात सापडले आहेत. अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागात गचड बिजनेस पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली. सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीचा एका गाळ्यामधे ही मोठी आग लागली. मात्र नंतर आग चार माळ्यांवर पसरली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑफिस आहेत, त्यामुळे आग आजूबाजूला वाढण्याची शक्यता होती. सुदैवाने या यागीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आग कशामुळे लागली या संदर्भात ओशिवरा पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहे.

या घटनेत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही. आग कशी लागली. आगीवर नियंत्रण मिळवून ती आटोक्यात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीमध्ये अनेक जण अडकले आहेत. आगीमध्ये तीन ते चार लोक जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...