Tuesday, August 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्तांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्तांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सप्तश्रृीं देवी निवासिनी ट्रस्टवर नेमण्यात आलेल्या नवीन विश्वस्तांच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनियुक्त विश्वस्तांच्या आंनदावर विरजन पडले आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधिस श्रीचंद जगमलानी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पत्र देवस्थान ट्रस्ट, धर्मादाय आयुक्त आणि जिल्हा न्यायिक विभागाला देत पुढील आदेशापर्यंत निवडीला स्थगिती दिल्याचे म्हटले आहे.

सप्तश्रृंगी देवस्थानने विश्वस्तांची निवड करताना अर्जमागवले होते. तसेच मुलाखत घेऊन सदस्यांची निवड केली होती. त्यात डॉ. कांचन देसले, डॉ. राजेंद्र वराडे, अ‍ॅड. राहूल खेताडे, विष्णू वारुंगसे, दिलीप देशमुख यांच्या निवडी २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी केल्याचे नमूद केलेले होते. परंतू उच्च न्यायालयाने या निवडीला स्थगिती देत ट्रस्टवर असलेले ऑनलाइन नावे हटवले आहे.


दरम्यान येत्या २६ मार्चपासून गडावर चैत्रोत्सव सुरू होत असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नुकतेच नियोजन बैठक घेऊन ट्रस्टला मार्गदर्शन केले होते. तसेच गडावर देवस्थानच्या कारभाराबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा बडगा गत महिन्यात उगारला होता. गडावर भाविकांना सोई-सुविधा देणार्‍या विकासकामात गती नसल्याची भाविकांमध्ये होती.

त्याचबरोबर गडावर घाट मार्गात रस्ता काँक्रिटीकरण कामाची गेल्या वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे. तसेच मंदिर आवारात नतुनीकरण काम सुरू आहे. मंदिरावर कलशारोहण करण्यात आलेले आहे. त्यामुळे गड यंदाच्या चैत्रोत्सवात चांगलाच चर्चेत आहे. मात्र नवीन विश्वस्त निवडीला स्थगिती मिळाल्याने चर्चेत पुन्हा भर पडली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...