Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाभारत आणि वेस्ट इंडिज अंतिम सामना निर्णायक ठरणार

भारत आणि वेस्ट इंडिज अंतिम सामना निर्णायक ठरणार

मुंबई : भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील हैद्राबाद सामना जिकून भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी मिळवली होती, त्यामुळे तिरुअनंतपुरम लढत जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी होती. पण भारतीय संघाला या संधीचा फायदा उठवता आला नाही. या सामन्यातील विंडीजच्या विजयामुळे मालिकेत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे मालिका विजयाचा मानकरी कोण ठरणार ? याचे उत्तर आपल्याला रविवारच्या सामन्यात मिळेल.

सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी ७ वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार यावर करण्यात येणार आहे. या मैदानावर एकूण ३३ हजार प्रेक्षक बसू शकतात. गरवारे पॅव्हेलियन एन्ड आणि टाटा एन्ड हे दोन एन्डस आहेत. आयपीएल संघ मुंबई इंडियन्स आणि रणजी संघ मुंबईचे घरचे मैदान आहे.

- Advertisement -

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांच्यावर आहे. गोलंदाजीत मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल यांच्यावर आहे.

विंडीज संघाच्या फलंदाजीची मदार इविन लुईस शिमॉन हेटमायर, लिंडल सिमेन्स, दिनेश रामदिन, निकोलस पुरण ब्रेंडन किंग यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड, फेबिअन अलेन, किमो पॉल गोलंदाजीत खारी पीर, शेफने रुदरफोर्ड हेडन वॉल्श , शेल्डन कोटरेल जेसन होल्डर आहेत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या