अहमदाबाद | Ahmedabad
आयपीएलमध्ये (IPL) मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी होणार आहे. आयपीएल १६ मधील सलग २ पराभवांची मालिका खंडित करून गुजरात टायटन्स संघाने विजयी लय प्राप्त केली आहे. आता मुंबईवर विजय संपादन करून स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी गुजरात मुंबईशी दोन हात करणार आहे….
चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाविरुद्ध पराभव स्वीकारून मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराईझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध विजय संपादन केले होते. त्यामुळे पंजाबकिंग्ज संघाविरुद्ध विजय संपादन करून विजयी चौकार मारण्याचे स्वप्न मनाशी बाळगलेल्या मुंबईच्या विजयी मोहिमेला अखेर पंजाबकिंग्ज संघाने ब्रेक लावला आहे. या पराभवातून सावरून गुजरात संघाला दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारून विजयी ट्रॅकवर परतण्याचा मुंबई संघाचा इरादा असणार आहे.
‘या’ बँक संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना झाला होता या पराभवाची परतफेड कारण्यादसाठी गुजरात संघ सज्ज असणार आहे. मुंबई संघाच्या खात्यात ६ सामन्यात ३ विजय आणि ३ पराभवासह ६ गुण आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा
गुजरात संघाच्या खात्यात ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुण आहेत. गुणतालिकेत मुंबई सहाव्या आणि गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईवर मात करून अव्वल २ संघांमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गुजरात उत्सुक आहे. गुजरात संघाविरुद्ध मोठा विजय संपादन करून अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाकडे असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.