Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, 'या' पर्यायी मार्गाने करा...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

मुंबई | Mumbai

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती (Accident Dead) निधनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway Traffic Block) ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे.

- Advertisement -

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS म्हणजेच इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठीच आज शुक्रवारी या महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम दुपारी १२ ते २ या वेळेत सुरू होणार आहे. वाहनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत. या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस वेवरील वाहनधारकांना किवळे ते सोमाटणे दरम्यानच्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या