Sunday, June 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! 'मातोश्री' बाहेर ड्रोनच्या घिरट्या, मुंबईत ड्रोन बंदी असताना, कोणी उडवला?...

मोठी बातमी! ‘मातोश्री’ बाहेर ड्रोनच्या घिरट्या, मुंबईत ड्रोन बंदी असताना, कोणी उडवला? व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेल्या मातोश्राीवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ड्रोनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा ड्रोन कोणी उडवला? त्यामागचा हेतू नेमका काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या घालतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन घिरट्या घालत असताना दिसून आला. हा ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या या ड्रोनचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यास मनाई आहे. अशातच आता मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘मातोश्री’ हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. पोलिसांना देखील याबाबत कळवण्यात आले आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मातोश्रीवर नजर ठेवली जात आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे गटाकडून भाजप ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीची टेहळणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.

मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून हे ड्रोन एमएमआरडीएचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमएमआरडीएने परवानगी घेतली होती. खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरातील सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन ड्रोन यासाठी उडवण्यात आले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...