Friday, May 3, 2024
Homeनाशिकमनपा सेवकांचा संप स्थगित

मनपा सेवकांचा संप स्थगित

नाशिक। प्रतिनिधी Nashik

आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक महापालिकेच्या ( Nashik Municipal Corporation ) म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या वतीने 15 जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता, मात्र महापालिका आयुक्त कैलास जाधव ( Municipal Commissioner Kailas Jadhav ) यांनी मागण्यांसंदर्भात लेखी पत्र दिल्याने संप स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिली.

- Advertisement -

याबाबत संघटनेच्यावतीने दिलेल्या म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना 100 टक्के पदोन्नती देण्याबाबत कर्मचारी संघटनेची मागणी आहे. या मागणीबाबत प्रशासनाने संभाव्य पात्र उमदेवारांच्या प्रारूप याद्या कर्मचारी निवड समितीच्या स्तरावर तयार करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.

वेळोवेळी पदोन्नती बाबत शासन स्तरावर निर्देश प्राप्त होत आहेत. तसेच उच्च न्यायालयाने दिनांक 29/06/2021 रोजी दिलेले आदेश कायम असून दिव्यांग आरक्षणाबाबत शासन निर्णय काढलेला आहे. याबाबत पदसंख्या सुनिश्चित करणेस उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने पदोन्नतीची कार्यवाही करण्यास अडचण आहे. या प्रकरणी न्यायालयाचा अवमान होणार नाही अशी दक्षता घ्यावी लागणार आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी पत्रान्वये दिलेले आहे.त्याच प्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनावरील काही पदांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत आदेश निर्गमित नाही. हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे लेखी खुलासा सादर केले असल्याने संघटनेच्यावतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

तर सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 01/01/2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याबाबत संघटनेची मागणी आहे.

याबाबत मनपाची आर्थिक स्थितीचा आढावा घेवून निर्णय घेण्यात येईल असेही लेखी पत्रात नमुद केले आहे. त्याचप्रमाणे पेंडींग प्रश्नांबाबत काही प्रश्न मार्गी लावण्यात आलेले आहे. व काही प्रश्न लवकरच कार्यवाही करुन निकाली काढण्यात येणार असल्याचा लेखी खुलासा सादर करण्यात आलेला आहे.त्यामुळे आजपासून होणारा संप तुर्त स्थगित करण्यात येत असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष प्रविण (बंटी) तिदमे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या