Saturday, July 4, 2026
Homeनगरअल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे 20 जून रोजी रात्री ते 21 जून रोजी पहाटे नऊ वर्ष वयाच्या मुलीचा झालेला मृत्यू श्वासनलिकेवर दाब दिल्याने गुदमरून गेल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की 20 जून रोजी रात्री घरी बहिणी सोबत झोपलेल्या नऊ वर्षे वयाच्या मुलीचा झोपेतच मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. तिच्या आई-वडिलांनी सर्पदंश झाल्याचा संशय व्यक्त केला होता. तिचे शवविच्छेदन जिल्हा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्यावर तिचा श्वासनलिकेवर दाब दिल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला. नेवासा पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : जमीन मोजणीची सव्वा लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; महसूल...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यात जमीन मोजणीच्या संदर्भातील १ लाख २८ हजार २९० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)...