Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाची हत्या

जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाची हत्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department )एका कनिष्ठ लिपिकाची गळा आवळून खून ( Murder )केल्याचा अहवालात शवविच्छेदनानंतर आल्याने याप्रकरणी तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की जलसंपदा विभागाच्या जलद गती कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय वसंतराव वायकांडे (३८,रा.मेरी वसाहत नाशिक) हे मंगळवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांना आढळून आल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात त्यांचा गळ्यावर दाबल्याच्या खुणा मिळून आल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी खुनाच्या तपासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असुन त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीत मी सकाळी घरी नव्हते व बाहेरून परत आल्यावर संजय वायकांडे हे बेशुद्ध अवस्थेत दिसल्याने मी त्यांना सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. दरम्यान याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या