Monday, May 20, 2024
Homeधुळेधक्कादायक ; मुलानेच केला आई आणि आजीचा खून

धक्कादायक ; मुलानेच केला आई आणि आजीचा खून

धुळे – प्रतिनिधी dhule

तालुक्यातील तरवाडे येथील मायलेकीच्या दुहेरी (Murder) हत्याकांडाचा गुन्हा (lcb) स्थानिक गुन्हे शाखेने 36 तासाच्या आतच उघडकिस आणला आहे. मुलाने आई आणि आजीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

चंद्रभागाबाई भावराव माळी (वय65) वंदना गुणवंत महाले (वय 45) या खाटेवर झोपलेल्या असतांना त्यांना कोणातरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन घातक हत्याराने दोघींच्या डोक्यावर वार करुन जिवे ठार मारले.

याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असतांना विविध संशयीतांना तपासले असता मयत वंदना महाले हिचे कुटुंबात कौटुंबिक कलह असल्याचे निदर्शनास आले.

वंदनाचे चारीत्र्याबाबत पती गुणवंत व मुले दिनेश व हितेश यांना संशय असल्याने त्यांचेत वाद होत असे. मयत वंदना ही सुमारे 3 महिण्यापासुन माहेरी तरवाडे येथे आई चंद्रभागासोबत राहत होती.

वंदना महाले हिला पती गुणवंत महाले व मुलांनी सासरी येण्यासाठी मध्यस्थी मार्फतीने प्रयत्न केले होते. परंतु मयत चंद्रभागा ही मुलगी वंदना हिस पाठविण्यासाठी संमती देत नव्हती. या बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्याआधारे व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना

माहीती प्राप्त झाली की, हा गुन्हा मयत वंदनाचा लहान मुलगा हितेश गुणवंत महाले (वय19 रा.आडगाव ता.एरंडोल जि.जळगाव) याने केल्याचा संशय बळावला.

हितेश महाले यास ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून सांगितले की,आई वंदना हिचे चारीत्र्यामुळे व वर्तनुकीमुळे सारे कुटुंब त्रस्त झाले होते.

यामुळे दि.23 रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आडगाव येथुन तरवाडे येथे मोटारसायकलने येवुन सोबत आणलेल्या लोखंडी पाईपने आजी चंद्रभागाबाई व आई वंदना हिचे डोक्यात वार करुन ठार मारल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली.

तसेच गुन्ह्यात वापरलेला लोखंडी पाईप परत जातांना फेकल्याची कबुली दिली असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी हितेश गुणवंत महाले याला गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि प्रकाश पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, योगेश राउत, पोहेकॉ संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण, पोना योगेश चव्हाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सुनिल पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या