Friday, May 3, 2024
Homeनगरमुसळवाडीत पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

मुसळवाडीत पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे सोपान गल्हे यांच्या शेतावर कृषी विभाग व व्ही.एन. आर. सिड कंपनीच्यावतीने पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे संचालक मधुकर पवार, सरपंच अमृत धुमाळ, विश्वास कुलकर्णी, सोपान कवडे, सुमीत डावखर, व्ही.एन. आर. सीडचे रिजनल व्यवस्थापक प्रदीप पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक आय. ए. पन्हाळकर, प्रॉङक्ट डेव्हलपमेंट व्यवस्थापक सुनील भोजने, जिल्हा व्यवस्थापक किरण गोपाळे, टाकळीमिया मंडळाचे कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे, अशोक पवार, उपस्थित होते.

- Advertisement -

व्हि .एन. आर. सिडचे आय. ए. पन्हाळकर यांनी भाजीपाला पिकातील नर्सरी व्यवस्थापना बाबतीत वांगी व ढोबळी मिरची पिकातील कलमाच्या लागवडीची सविस्तर माहिती दिली. तसेच कारले लागवड कशी करावी, हंगाम तसेच खते व औषध फवारणी शेड्युल समजावून सांगितले. विश्वास कुलकर्णी यांनी कारले, टरबूज व खरबूज लागवडीची व औषधांची माहिती दिली. टाकळीमिया मंडळाचे कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे यांनी महाडीबीटी पोर्टेलवरील शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, घरचे बियाणे कसे वापरावे, तसेच फळबाग लागवड योजनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब भुजाडी, सुरेश थेवरकर, सचिन घोलप, अतुल इंगळे, संदीप घोलप, रामेश्वर गल्हे, रवि खर्डे, दिनेश गल्हे, ऋषिकेश गल्हे उपस्थित होते. आभार किरण गोपाळे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या