Friday, May 3, 2024
Homeनाशिकमविप्र निवडणूक : थोड्याच वेळात पहिल्या फेरीच्या मतमोजणीला प्रारंभ

मविप्र निवडणूक : थोड्याच वेळात पहिल्या फेरीच्या मतमोजणीला प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. मविप्रत ‘प्रगती’च राहणार की ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

- Advertisement -

आता मत गठ्ठ्यांची विभागणी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात पहिल्या फेरीच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी जिल्ह्याभरातून कार्यकर्त केटीएचएममध्ये दाखल होत आहे. सभासद आणि समर्थकांनी केटीएचएमच्या मेनगेट जवळ आपली वाहने पार्क करू नये. पार्किंगची व्यवस्था रावसाहेब थोरात सभागृहाच्या पार्किंगमध्ये आणि केटीएचएमच्या मागील पार्किंगमध्ये करण्यात आली आहे.

तरी समर्थकांनी आपली वाहने रावसाहेब थोरात पार्किंग आणि केटीएचएमच्या मागील पार्किंगमध्ये पार्क करून सहकार्य करावे, अन्यथा ही वाहने टोईंग करण्यात येतील, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या