Friday, May 3, 2024
Homeनाशिकभारीच! नाशिकचा अवलिया शिक्षक गेल्या सात वर्षांपासून भरतोय विद्यार्थ्यांचा 'आरोग्य विमा'

भारीच! नाशिकचा अवलिया शिक्षक गेल्या सात वर्षांपासून भरतोय विद्यार्थ्यांचा ‘आरोग्य विमा’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केटीएचएम महाविद्यालयातील (KTHM College Nashik) प्रा.अविनाश गंगाधर दवंगे (Prof Avinath Gangadhar Dawange) यांनी आपले जन्मगाव जऊळके वणी (birthplace jaulake wani) येथील मविप्र संस्थेच्या शाळेतील ३० विद्यार्थ्यांचा वार्षिक मेडिक्लेम विम्याचा हप्ता भरण्यासाठीचा चेक मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याकडे सुपूर्द केला…

- Advertisement -

अवघे दोन वर्षांचे असताना पितृछत्र व पंधराव्या वर्षी मातृछत्र हरपलेल्या दवंगे सरांनी आपण आपल्या समाजाचे व जन्म गावाचे ऋणी आहोत. या भावनेतून गेल्या ७ वर्षापासून जऊळके वणी येथील मविप्र शाळेतील विद्यार्थ्यांचा दरवर्षी आरोग्य विमा काढण्याचा संकल्प केला व तो अव्याहतपणे चालू ठेवला आहे.

त्यांनी काढलेल्या मविप्र मेडिक्लेम पॉलिसीमुळे (MVP Claimed Policy) अनेक गरजू विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मदतीचा हात मिळाला आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत गरजू विद्यार्थ्यांना सदोदित मदतीचा हात पुढे करणाऱ्या दवंगे सर यांचे नीलिमाताई पवार (Nilimatai Pawar) व संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळाने मनापासून कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे शिक्षणाधिकारी सी डी शिंदे, इंजिनियर तपकिरे हे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या