Thursday, May 2, 2024
Homeनगरनवीन वर्षात पदार्पण करताना नगर खड्डेमुक्त करणार

नवीन वर्षात पदार्पण करताना नगर खड्डेमुक्त करणार

खासदार डॉ. सुजय विखे पाटील : शहरासह विविध रस्त्यांची पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरासह बाहेरील महामार्गाचे सुरू झालेले काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. या रस्त्याच्या कामामुळे जनतेची मोठी समस्या दूर होणार असून अहमदनगर शहर खड्डेमुक्त करूनच नवीन वर्षात पदार्पण करण्याचा निर्धार खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अहमदनगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा व शिंगवे नाईक, नगर शहरातील नीलक्रांती चौक, अहमदनगर-पुणे बाह्यवळण रस्ता व इतर रस्ते दुरुस्तीची पाहणी खा. डॉ. विखे पाटील यांनी स्थानिक नगरसेवक, अधिकारी यांच्या समवेत केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अपघातांची संख्या वाढली होती. रस्त्यांची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी खा. डॉ. विखे यांनी विधानसभा निवडणुकीची अचारसंहीता संपताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन रस्त्याची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रस्त्यांची ही कामे जलदगतीने पूर्ण करतानाच या कामातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून संसदेत तसेच संबधित विभागाच्या मंत्र्याकडे पाठपुरावा करून डॉ. विखे यांनी कामाला गती दिली आहे.

ते म्हणाले, रस्त्यांच्या कामाचे आश्वासन आपण नागरिकांना दिले होते. त्याची पूर्तता होत असल्याचे समाधान आहे. नव्या वर्षात पदार्पण करताना सर्वांच्या सहकार्याने अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याची संकल्पना यशस्वी होईल. सुरू असलेल्या कामाची पाहाणी करून येणारे अडथळे दूर करण्याची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

या वेळी कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. जी. गायकवाड, कनिष्ठ अभियंता ए. ए. भांगे, उपअभियंता राजभोज, कार्यकारी अभियंता ए. बी. चव्हाण, उपअभियंता एम. एस. कजबे, नगरसेवक निलेश भागरे, डॉ. सुरेश बोरुडे, दत्ता सप्रे, धनंजय जाधव, अमोल लगड व शिंगवे नाईक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या