Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्ह्यात आणखी 28 जणांना करोना ; शहरात 24 बाधित

जिल्ह्यात आणखी 28 जणांना करोना ; शहरात 24 बाधित

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील 24, कर्जत तालुक्यातील 02, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या आता 105 इतकी झाली आहे.

नगर शहरात सिद्धार्थ नगर भागात 06, वाघगल्ली नालेगाव भागात 04, तोफखाना भागात 12 आणि सिव्हिल हडको भागात दोन रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय शिर्डी येथे एक आणि कर्जत तालुक्यातील आळसुंदे येथे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील जवळके येथे एक रुग्ण बाधित आढळून आला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. सिव्हिल हडको भागात आढळून आलेले रुग्ण हे मूळचे जगतापवाडी येथील आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यातील 05 करोनाग्रस्त रुग्ण आज सकाळी बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या आता 265 इतकी झाली आहे. करोनातून बर्‍या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील 03, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. गाढे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या