Saturday, October 24, 2026
HomeनगरAccident News : आयशर टेम्पो आणि कारची भीषण धडक ; एकाच कुटूंबातील...

Accident News : आयशर टेम्पो आणि कारची भीषण धडक ; एकाच कुटूंबातील चौघे ठार

अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीप समोर गुरुवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो (Eicher Tempo) आणि वॅगनर कारची (WagonR Car) भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला. मृतांमध्ये शकील मोहम्मद शेख (वय 45), सलमा शकील शेख (वय 42), ईकबाल शकील शेख (वय 23) आणि सुमैय्या शकील शेख (वय 18, सर्व रा. गेट नं. 6, नुराणी मशीदसमोर, मालवणी, मुंबई) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत अल्ताफ शब्बीर शेख (वय 52, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी वॅगनर कार (क्र. एमएच 47 सीके 1308) मधून येत होते. पहाटे दोनच्या सुमारास भाळवणी (Bhalwani) शिवारातील हॉटेल संदीपसमोर त्यांच्या कारला आयशर टेम्पो (क्र. एमएच 16 सीडी 2747) ने समोरून जोराची धडक दिली.

धडकेनंतर वॅगनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील शकील शेख, सलमा शेख, ईकबाल शेख आणि सुमैय्या शेख हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला माहिती दिली. त्यानंतर जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात (Parner Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चौघांनाही सकाळी 10 वाजून 56 मिनिटांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळी थांबला नाही, अशी फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चालकाविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

सप्तशृंगीगडावर हजारो कावडधारक दाखल; कोजागिरी उत्सवासाठी गड सज्ज

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर घुंगरांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका आणि ‘आई सप्तशृंगी मातेचा जयजयकार’ अशा भक्तिमय घोषणांनी सप्तशृंगगडाकडे जाणारे रस्ते दुमदुमून गेले आहेत. कोजागिरी पौर्णिमा...