Wednesday, December 4, 2024
Homeनगरनगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल व टँकरचा अपघात; एक ठार

नगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल व टँकरचा अपघात; एक ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) पाण्याच्या टाकी परिसरात मोपेड मोटारसायकल व टँकरच्या झालेल्या अपघात (Bike And Tanker Accident) एक परप्रांतीय एक तरूण वेटर जागीच ठार (Death) झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, अनंतराम अजय सिंह (वय 19 वर्षे, रा. मोहोदीपूर, बीड, सितापूर, जि. सिंधाली, उत्तर प्रदेश) हा परप्रांतीय तरूण राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad Highway) एका हॉटेलवर कामाला होता. आज त्याला उत्तर प्रदेश येथे आपल्या घरी जायचे होते. त्यामुळे त्याला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हॉटेल मधील एक साथीदार राहुरीच्या बसस्थानकावर सोडण्यास मोपेडवरून निघाला असता महामार्गावर पाठीमागून येणार्‍या एका टँकरने त्यांच्या मोपेड मोटारसायकला जोराची धडक (Hite) दिली. या धडकेत अनंतराम अजय सिंह याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. तसेच त्याचा साथीदार किरकोळ जखमी (Injured) झाला. या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. तुलसीदास गिते करीत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या