Saturday, September 12, 2026
HomeनगरAccident News : येसगाव जवळील अपघातात एक जण ठार

Accident News : येसगाव जवळील अपघातात एक जण ठार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगर-मनमाड महामार्गावर येसगाव येथील डाव्या कालव्या जवळ, कोपरगावकडून येवल्याकडे जात असलेल्या टाटा मेघा गाडी क्रमांक एमएच 45 एफ 2161 या चारचाकी गाडीने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोराची धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. टाटा मेघा गाडी रोडच्या कडेला असलेल्या नालीत उलटली. गाडीत पंधरा ते वीस तरुण होते. हा अपघात रविवारी रात्री 8:30 वाजे दरम्यान घडला.

- Advertisement -

नवरात्र उत्सव निमित्त सप्तशृंगी गडावरून ज्योत आणण्यासाठी नेवासा येथील कार्यकर्ते वाहनांतून जात असताना, कोपरगाव येवला रोडवर येसगाव जवळील डाव्या कालव्या जवळ कामावरून घरी पायी चाललेल्या दत्तात्रय महादू शेलार रा. खिर्डी, गणेश ता. कोपरगाव, आणि नाना रंगनाथ दराडे रा. बाजीराव नगर, येवला या दोघांना जोराची धडक दिली. या धडकेत हे दोघेही गंभीर जखमी झाले. माणसांनी भरलेली टाटा मेघा गाडी रोडच्या कडेला असलेल्या नालीत उलटली.

अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक गोळा झाले. गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमी नाना दराडे यांना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले; उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दुसरे जखमी शेलार यांना कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर लोणी येथे उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...