Friday, May 3, 2024
Homeनगरदिवाळीनंतर नगर बाजार समितीची रणधुमाळी !

दिवाळीनंतर नगर बाजार समितीची रणधुमाळी !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाच कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल असणार्‍या आणि नगर शहर, तालुका आणि दक्षिण जिल्ह्यातील राजकारणात महत्वाच्या असणार्‍या नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतर उडणार आहे. सहकार कायद्यातील नवीन नियमानूसार आता बाजार समितीची निवडणूक जिल्हा उपनिबंधक घेणार आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नगरच्या बाजार समितीच्या मतदारांची यादी मागवली आहे.

- Advertisement -

नगरच्या बाजार समितीची निवडणूक लागणार असल्याने नगर शहर आणि तालुक्यातील राजकीय वातावरण दिवाळीनंतर ढवळून निघाणार आहे. नगर शहरातील बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांचा मुद्यावर चांगलेच आरोप प्रत्यारोप होणार आहेत. नगरच्या बाजार समितीचा वार्षिक उलाढाल ही पाच कोटींपेक्षा अधिक आहे. पूर्वी जुन्या कायद्यानूसार तीन कोटीच्या आत उलाढाल असणार्‍या बाजार समित्यांची निवडणूक सहकार खाते घेत होते. तर पाच कोटी अथवा त्यापेक्षा अधिक उलाढाल असणार्‍या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी घेत होते. मात्र, नवीन कायद्यानूसार आता सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका या सहकार खाते घेणार आहेत.

त्यानूसार नगरचे जिल्हा उपनिबंधक हे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार असून त्यांनी बाजार समितीला मतदार यादी मागवली आहे. बाजार समितीचे सभासद असणारे व्यापारी, हमाल आणि मापाडीची याची यादी बाजार समिती सादर करणार असून ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांची यादी नगर गटविकास अधिकारी सादर करणार आहेत. ही यादी आल्यानंतर प्रारूप आणि अंतिम मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर लगेच बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. साधारणपणे जानेवारीचा शेवटचा आठवडा अथवा फेबु्रवारीचा पहिल्या आठवड्यात नगर बाजार समितीची निवडणूक होणार आहे.

चौकशी सुरू असतांना थेट निवडणूक

नगर बाजार समितीच्या नगर शहरातील आवारातील गाळे विक्री प्रकरणावरून सत्ताधारी गटाविरोधात तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना यांच्या आघाडीने तक्रार करत बाजार समितीची चौकशीची मागणी केलेली आहे. त्यावर बाजार समितीने सहकार खात्याला या चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यानंतरही सादर केलेली नाहीत. तसेच बाजार समितीकडून त्यांचे म्हणणे मांडण्यास वेळोवेळी मुदत मागण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या कामकाजाबाबत चौकशी सुरु असतांनाच अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

सध्या कर्डिले यांचे वर्चस्व

नगरच्या बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षापासून माजी शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे वर्चस्व राहिलेले आहे. खून प्रकरणात कोतकर यांना अटक झाल्यानंतर बाजार समितीवरील आपली पकड कर्डिले यांनी घट्ट ठेवलेली आहे. विरोधकांना गेल्या काही वर्षात या ठिकाणी सत्ता आणता आलेली नाही. सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे आ. अरूण जगताप यांचे जवळचे नातेवाईक चेअमरन म्हणून काम पाहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या