Friday, May 3, 2024
Homeनगरनगरसाठी 30 लाखांची ऑक्सिजन कॉन्सट्रटर उपलब्ध

नगरसाठी 30 लाखांची ऑक्सिजन कॉन्सट्रटर उपलब्ध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यामध्ये करोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मोठी गरज निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध सामाजिक संस्थाना मदतीसाठी पद्मश्री पोपटराव पवार यांनी आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत आरोग्य सेवेत उत्तम काम करणार्‍या स्वास्थ्य या संस्थेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 ऑक्सिजन कॉन्सट्रटर उपलब्ध करून देण्यात आले.

- Advertisement -

यातील प्रत्येकी ऑक्सिजन कॉन्सट्रटर किंमत 1 लाख रुपये असून 30 युनिटची किंमत 30 लक्ष आहे. या ऑक्सिजन कॉन्सट्रटर यंत्रामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. प्रशासनाला संकटाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी पद्मश्री पोपटराव पवार यांचे आभार मानले. हे यंत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.श्री.आनंद अभय बंग यांचे पद्मश्री पवार यांनी आभार मानले. जिल्ह्यासाठी आणखी व्हेंटीलेटर मिळण्यासाठी विविध संस्थाकडे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पद्मश्री पवार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या