Wednesday, January 7, 2026
Homeनगरनगर अर्बनच्या संगमनेर, बेलापूरसह चार शाखांना टाळे

नगर अर्बनच्या संगमनेर, बेलापूरसह चार शाखांना टाळे

दैनंदिन खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी चार शाखा 23 मे पासून बंद करण्यात येणार आहेत. दैनंदिन खर्चात बचत करण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

बंद होणार्‍या शाखांमध्ये संगमनेर, बेलापूर, नगर मार्केट यार्ड व केडगाव (इंडस्ट्रीयल इस्टेट) या चार शाखांचा समावेश असून या सर्व शाखांचे कामकाज नगर- मुख्य शाखेतून होणार आहे. बंद होणार्‍या शाखांमधील खातेदार लॉकर धारकांनी लॉकरमधील वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असे आवाहन देखील बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापूर्वीही काही शाखा बंद करण्यात आल्या आहेत.

YouTube video player

बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डीआयसीजीसी व केंद्रीय निबंधक नवीदिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फॉर्म नजीकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक गायकवाड यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेच्या प्रचार निवडणुकीचा (Nashik Municipal Election) दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, यंदाची निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यंदाच्या...