Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : नागरदेवळे शिवारात गांजाची बेकायदा लागवड उघड

Crime News : नागरदेवळे शिवारात गांजाची बेकायदा लागवड उघड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नागरदेवळे शिवारातील अमरधामच्या पूर्व भिंतीलगत असलेल्या शेतात गांजाची बेकायदा लागवड केल्याचा प्रकार भिंगार कॅम्प पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी कारवाई करत गांजाची 22 हिरवीगार झाडे जप्त केली. या झाडांचे वजन 31 किलो 630 ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत 3 लाख 16 हजार 300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सुशाबाई जास काळे (वय 59, रा. बुर्‍हाणनगर, अहिल्यानगर) हिच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला नागरदेवळे शिवारातील एका ठिकाणी गांजाची झाडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची तयारी करण्यात आली. पोलिसांचे पथक रात्री सुमारे 8 वाजता नागरदेवळे शिवारातील अमरधामच्या पूर्व भिंतीलगत असलेल्या गट क्रमांक 117 मधील शेतात पोहोचले. तेथे पाहणी केली असता गांजासदृश 22 हिरवीगार झाडे आढळून आली.

कृषी मंडळ अधिकारी भास्कर कारभारी गिते यांनी ही झाडे गांजाची असल्याची खात्री केली. त्यानंतर पंचांसमक्ष झाडांची उंची मोजण्यात आली. काही झाडे पाच फूट तर काही झाडे सहा फूट उंचीची असल्याचे आढळले. सदर शेतजमीन सुशाबाई जास काळे हिच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची लागवड करून त्याची निर्मिती व विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...